संस्थेविषयी
About the Sanstha
वाटचाल · Our Story
१९९८ पासून आजवर
From 1998 to Today
श्री लक्ष्मीनारायण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित ही दि. १ ऑगस्ट १९९८ रोजी नोंदणीकृत होऊन दि. ३ सप्टेंबर १९९८ रोजी नृसिंहवाडी येथे स्थापन झाली. दत्तक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावातील सामान्य कुटुंबांना, छोट्या व्यावसायिकांना व नोकरदारांना सहकाराच्या माध्यमातून विश्वासार्ह अर्थपुरवठा उपलब्ध करून देणे हा संस्थेचा मूळ हेतू.
Shree Laxminarayan Gramin Bigar Sheti Sahakari Patsanstha Maryadit is a co-operative credit society registered on 1 August 1998 and established at Nrusinhawadi on 3 September 1998. Its purpose has always been the same: to bring dependable co-operative finance within reach of the ordinary households, small traders and salaried families of this pilgrim town.
‘धनम् जनहिताय’ — संपत्ती ही जनहितासाठी. ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवणे आणि तोच पैसा गावातील गरजू सभासदांना वाजवी व्याजदराने अर्थसहाय्य करणे, या दोन गोष्टींभोवती संस्थेचे संपूर्ण कामकाज फिरते.
‘Dhanam Janahitaya’ — wealth, for the good of the people. Its whole working turns on two things: keeping depositors' money safe, and putting that same money back to members in need as financial assistance, at a fair rate.
आज संस्थेचे ७७९ सभासद असून ठेवी रु. ४,१२७ लाखांवर पोहोचल्या आहेत व खेळते भांडवल रु. ५,०२१ लाख आहे. १९९८ पासून आजवर ‘अ’ वर्ग लेखापरीक्षण, घटती थकबाकी व कमी झालेला एन.पी.ए. ही संस्थेच्या आर्थिक शिस्तीची पावती आहे.
The sanstha today has 779 members, deposits of ₹4,127 lakh and working capital of ₹5,021 lakh. From 1998 till today, a steady class ‘A’ audit rating, falling overdues and a reduced NPA have been the measure of its financial discipline.
नोंदणी तपशीलRegistration
- नोंदणी क्रमांक · Registration number
- के.पी.आर./एस.आर.एल./आर.एस.आर. (सी.आर.) १९९३/९८-९९/९८
- नोंदणी दिनांक · Date of registration
- १ ऑगस्ट १९९८
- कार्यक्षेत्र · Area of operation
- शिरोळ तालुका
- लेखापरीक्षण वर्ग · Audit classification
- ‘अ’ वर्ग


संचालक मंडळ · Our Committee
संस्थेचे संचालक मंडळ
The Sanstha's Committee
सभासदांनी निवडून दिलेले संचालक मंडळ संस्थेचा कारभार पाहते.
The committee, elected by the members, that runs the sanstha's affairs.

श्री. सतीश नंदकुमार कोडणीकरचेअरमन

कु. विजया बंडो पुजारीव्हा. चेअरमन

अॅड. विद्याधर गोपाळराव सरदेसाईसंस्थापक-संचालक (सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, जयसिंगपूर)

डॉ. किरण विद्याधर आणुजे (M.B.B.S.)संचालक

श्री. शशिकांत कल्याण बड्ड पुजारीसंचालक

श्री. उमेश बाळकृष्ण पुजारीसंचालक

श्री. श्रीपाद विष्णुपंत खोचरेसंचालक

श्री. सागर आण्णासो आणुजेसंचालक

श्री. महादेव वसंत पुजारीसंचालक

सौ. नेहा नरेंद्र विभूतेसंचालिका

श्री. अश्विनकुमार गजानन गवळीसंचालक

श्री. माधव नरहर पुजारी घाटेतज्ञ संचालक

सी.ए. श्री. सचिन पुरुषोत्तम उपाध्येसंस्थेचे मार्गदर्शक

सौ. वनिता अवधूत शिंदेमुख्य कार्यकारी अधिकारी

श्री. यशवंत गजानन कुलकर्णीसिनिअर ऑफिसर

श्री. गुरुप्रसाद दत्तात्रय रिसबूडसंस्थेचे व्हॅल्युएटर

श्री. दीपक आपासो कबाडेसंस्थेचे व्हॅल्युएटर
बँकर्स · Bankers
संस्थेचे बँकर्स
Our Bankers
- कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि., कोल्हापूर
- सांगली अर्बन को-ऑप बँक लि., सांगली
- श्री महालक्ष्मी को-ऑप बँक लि., कोल्हापूर
- श्री भरत अर्बन को-ऑप बँक लि., जयसिंगपूर
- कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह. बँक लि., इचलकरंजी
- फेडरल बँक
